बॉलिवु़ड का बादशहा कोण ?
राज्यातील महाविकास आघाडीने आता आक्रमक पावित्रा घेत “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा नामोल्लेख न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
X
महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महत्वाकांशी जलयुक्त योजनेच्या चौकशी घोषणा केल्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता थेट "बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत," असा इशारा दिला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूडमधील कलाकारांवर आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक कलाकारांची नावं घेतली जात आहे. बॉलिवूडमधील या वादावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं. बॉलिवूडवर केल्या जात असलेल्या आरोपांवर दुःख व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात होत असलेल्या फिल्मसिटीवरही भूमिका मांडली. गेली दोन दिवस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरेंमधील पत्रवाद सुरु होता. कालच राज्यमंत्री मंडळाने जलयुक्त शिवाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची घोषणा केली.
राज्यपालांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी,` माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही`, असे उत्तर दिले होते. अभिनेत्री कंगना रणौत सातत्याने महाविकास आघाडीवर टिका करत आहे. तिच्या मुंबईतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानंतर तीने राज्यपालांची भेट घेतली होती. अलिकडच्या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूडमधील कलाकारांवर आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक कलाकारांची नावं घेतली जात आहे. बॉलिवूडमधील या वादावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं.
लोकसभेत भाजपचे खासदार रवीकिशन यांनी बॉलिवूडच्या 'ड्रग्ज कनेक्शन'बाबत संसदेत आवाज उठवल्यावर रवी किशन हे चर्चेचे केंद्र ठरले होते. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी त्यांच्यावर आगपाखड केली. ज्या थाळीत खातो त्याच थाळीचा छेद केल्याचा आरोप जया यांनी किशन यांच्यावर केला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीजनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठविली.
त्यांच्याकडून फिल्म इंडस्ट्री बदनाम होत असल्याची टीका झाली होती. करोनामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिलं. "मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलिवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहे. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे.
सिनेमासृष्टी हे एक मोठं मनोरंजन उद्योग क्षेत्र असून, या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते. तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत," असा इशारा अप्रत्यक्ष इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. योगी आदित्यनाथ आणि उध्दव ठाकरेंमधील संघर्ष आता बॉलिवूडचा बादशहा कोण? यावरुन वाढत असल्याचे दिसत आहे.