Home > News Update > 'लूज बॉल आला की फटका मारायचाच. तो क्रिकेटमध्ये असो किंवा राजकारणात असो.'- मुख्यमंत्री ठाकरे

'लूज बॉल आला की फटका मारायचाच. तो क्रिकेटमध्ये असो किंवा राजकारणात असो.'- मुख्यमंत्री ठाकरे

लूज बॉल आला की फटका मारायचाच. तो क्रिकेटमध्ये असो किंवा राजकारणात असो.- मुख्यमंत्री ठाकरे
X

मुंबई : 'लूज बॉल आला की फटका मारायचाच. तो क्रिकेटमध्ये असो की किंवा राजकारणात असो. पण फटका मारताना विकेटही जाऊ द्यायची नाही' असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वानखेडे स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात जोरदार बॅटिंग केली. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत-पाकिस्तान सामन्या निर्माण झालेल्या वादावरून नाराजी व्यक्त केली.

वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे "द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स" आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियममधील नॉर्थ स्टँडचे "दिलीप वेंगसरकर स्टँड" असं नामकरण करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेटच्या आठवणींना उजाळा दिला सोबतच राजकीय टोलेबाजीही केली.

समोरचे स्विंग मला चांगले कळतात. मी आता मैदानात उतरलो आहे, ते देखील जगविख्यात संघाकडून, माझी आठवण फक्त इथल्या धावपट्टीसोबत आहे क्रिकेट जनतेच्या रक्तात भिनलं आहे. मलाही वाटायचं क्रिकेटर व्हावं. पण होवू शकलो नाही, अशी खंत मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलून दाखवली.

दरम्यान अलीकडे झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात आपल्या संघाला पराभव आला. पण पाकविरोधात हरल्यानंतर काही खेळांडूविरोधात प्रतिक्रिया उमटल्या. त्या अशोभनीय होत्या. उद्याची मॅच आपण नक्की जिंकू, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

Updated : 30 Oct 2021 8:21 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top