Home > News Update > दिल्लीवाल्यांनो, शिवाजी महाराजांच्या मराठी अभिजात भाषेचा दर्जा नाकारणारे तुम्ही कोण ? मुख्यमंत्री

दिल्लीवाल्यांनो, शिवाजी महाराजांच्या मराठी अभिजात भाषेचा दर्जा नाकारणारे तुम्ही कोण ? मुख्यमंत्री

मराठी ही केवळ मातृभाषाच नसून ती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. शिवाजी महाराजांच्या मुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघु शकतो आहोत. त्यामुळे मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जाच नव्हे तर सर्वोच्च भाषा म्हणून मान्यता मिळाली पाहिजे .पुढच्या मराठी भाषा दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे हे ध्येय प्रत्येक मराठी सुपुत्र व कन्येने बाळगले तर कोणाची हिंमत आहे हा दर्जा न देण्याची', अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय समितीला लक्ष्य केले.

दिल्लीवाल्यांनो, शिवाजी महाराजांच्या मराठी अभिजात भाषेचा दर्जा नाकारणारे तुम्ही कोण ? मुख्यमंत्री
X

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम कोणी करायचे, काय करायचे याचे उत्तर शोधण्याची गरज नाही. हे काम आपणच करायचे आहे. त्यात केवळ 'हॅप्पी मराठी भाषा डे' असे संदेश उद्या नाही आले म्हणजे मिळवले, असा सणसणीत टोलाही मुख्यमंत्र्यांनी मराठीची मोडतोड करणाऱ्यांचा हाणला.

लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेतून लिहीलेला अग्रलेख ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?' याची दखल इंग्रजांना घ्यावी लागली होती. मराठी भाषेला गौरवशाली संस्कृती आहे. याचाही मुख्यमंत्रांनी उल्लेख केला. त्याचबरोबर शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची त्याचबरोबर सोप्या भाषेतील शब्द कोश तयार बरोबर गरजही त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्रवीर सावरकर यांनी मेयर या शब्दाला महापौर हा प्रतिशब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असुन पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केले जातील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे (वेबिनार) परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेबिनारला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री अनिल परब,मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांच्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.

यावेळी झालेल्या परिसंवादातील "मराठी भाषेला अभिजात दर्जा" या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, डॉ. विजया वाड, प्रा. हरी नरके, माजी विधानपरिषद सदस्य हेमंत टकले, प्रा. मिलिंद जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले. "आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार" या विषयावरील परिसंवादात विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, बुक गंगा डॉट कॉमचे मंदार जोगळेकर, स्टोरी टेल ॲपचे प्रसाद मिरासदार, युनिक फिचर्सचे. आनंद अवधानी, पत्रकार रश्मी पुराणिक माजी सनदी अधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख, वक्ते म्हणून सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उत्तरा मोने यांनी केले.

Updated : 27 Feb 2021 9:02 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top