पोलीस आणि अग्निशमन विभागातील 'त्या' अधिकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
पोलीस शौर्य, राष्ट्रपती पोलीस पदक, अग्नि शौर्य पदक विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.तुमच्या शौर्याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
X
मुंबई : पोलीस दलातील योगदानासाठी राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक, आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक विजेत्या पोलिसांचे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अभिनंदन करत कौतुक केले. राज्यातील 74 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेतील योगदानाबाबत गौरवण्यात आलं आहे.
सोबतच राज्याच्या अग्निशमन दलातील 8 आठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील अग्निशमन विभागातील त्यांच्या योगदानाबद्दल 'अग्निशमन सेवा शौर्य पदक' जाहीर झाले आहे. या अग्निशमन कर्मचाऱ्यांचे देखील राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अभिनंदन केले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक, तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक, उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक पटकावणाऱ्या राज्यातील ७८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. https://t.co/yedir0k4ue
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 14, 2021
आम्हाला तुमच्या धडाडीचा आणि कर्तृत्वाचा अभिमान असल्याचं यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व विजेत्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.