Home > News Update > मुख्यमंत्री करणार "मॅक्स महाराष्ट्र"च्या "चिंतन" वार्षिकांकाचे प्रकाशन

मुख्यमंत्री करणार "मॅक्स महाराष्ट्र"च्या "चिंतन" वार्षिकांकाचे प्रकाशन

मुख्यमंत्री करणार मॅक्स महाराष्ट्रच्या चिंतन वार्षिकांकाचे प्रकाशन
X

che मॅक्स महाराष्ट्र च्या चिंतन वार्षिकांक-२०२४ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन येत्या ५ मार्च रोजी मुंबईत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच हस्ते या अंकांचे प्रकाशन होणार आहे.यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, कपिल पाटील (आमदार, विधानपरिषद), आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक, डॉ. तात्यासाहेब लहाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  • प्रकाशन कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्ये

या प्रकाशन कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत ज्ञानेश महाराव यांचे "लोकशाही संवाद " या विषयवार व्याख्यान होणार आहे.

ज्ञानेश महाराव हे मराठी साप्ताहिक "चित्रलेखा" चे संपादक होते..त्यांनी आतापर्यंत २० पेक्षा अधिक मराठी पुस्तके लिहिली असून एक परखड लेखक, वक्ते-व्याख्याते अशीही त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे.

  • कुठे होणार "चिंतन" वार्षिकांक प्रकाशन सोहळा

मॅक्स महाराष्ट्रचा चिंतन वार्षिकांक प्रकाशन सोहळा ५ मार्चला दुपारी ३ वाजता होणार असून हा कार्यक्रम 'रंगस्वर' सभागृह चौथा माळा, यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई याठिकाणी संपन्न होणार आहे. 'मॅक्स महाराष्ट्र' चे संचालक रवींद्र आंबेकर,'मॅक्स महाराष्ट्र' चे कार्यकारी संपादक मनोज भोयर, 'मॅक्स वुमन' च्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे,'मॅक्स किसान' चे प्रमुख संतोष सोनवणे, 'मॅक्स महाराष्ट्र' चे वरिष्ठ प्रतिनिधी किरण सोनवणे, 'मॅक्स महाराष्ट्र' चे सहसंपादक सागर गोतपागर आणि संपादक मंडळातील सदस्य विकास मेश्राम यांनी या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आपल्या मित्रपरिवारांसह जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री सिद्धी ढोके करणार आहेत.

  • "मॅक्स महाराष्ट्र" च्या "चिंतन" वार्षिकांकात नेमके काय ?

महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या जवळपास ५० तज्ज्ञांच्या दीर्घ लेखांचा संग्रह म्हणजे “मॅक्स महाराष्ट्रचा हा चिंतन वार्षिकांक आहे.या अंकात कृषी, अर्थ, राजकीय, सामाजिक.महिला आणि माध्यम अशा विषयातले अत्यंत अभ्यासपूर्ण असे लेख आहेत.याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात त्यांचं व्हिजन मांडणारे अत्यंत वाचनीय असे लेख आहेत. यातून वाचकांना राज्याच्या विकासाचं नवं प्रारूप कसं असावं याचा अंदाज येऊ शकेल.अंकाचे एकूण सहा विभाग आहेत. कृषी, अर्थ, सामाजिक, महिला आणि माध्यम.

  • कृषी विभाग

शेतीविषयक अभ्यासक विजय जावंधिया आणि किसान पुत्र अभियानाचे प्रमुख अमर हबीब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी,कृषी मंत्री धंनजय मुंडे,

जैन इरिगेशन सिस्टिमचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे , कृषी अभ्यासक मिलिंद मुरुगकर,

  • अर्थ विभाग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान,अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर,

आयडीबीआय मार्केट आणि सिक्युरिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष, अमेय बिलोरकर, अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर,सीए अजित जोशी, बँकिंगतज्ज्ञ विश्वास उटगी, अर्थविषयाचे अभ्यासक भालचंद्र कांगो, सायबर तज्ज्ञ गौरव सोमवंशी

  • राजकीय विभाग

खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, सुप्रसिद्ध लेखक समीर गायकवाड आणि ज्येष्ठ लेखिका मुग्धा कुलकर्णी, निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे

  • सामाजिक विभाग

ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक आ. ह. साळुंखे,राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ समाजसेवक कुमार सप्तर्षी, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, संविधान अभ्यासक सुभाष वारे, ज्येष्ठ लेखक ज. वि. पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दगडू लोमटे,अविनाश उषा वसंत,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शमसुद्दीन तांबोळी

  • महिला विभाग

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, 'मिळून साऱ्या जणी'च्या संपादिका गिताली वि. म. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, बालकल्याण समिती पुण्याच्या अध्यक्ष डॉ. राणी खेडीकर

  • माध्यम

ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे

आणि स्वतंत्र पत्रकार सोहित मिश्रा

  • "मॅक्स महाराष्ट्र" ची भूमिका काय ?

राज्यकर्ते आणि प्रशासन सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रात विकासाची ब्लू प्रिंट जनतेसमोर ठेवत असतात. त्यातून जनतेचे किती समाधान होते.हे मोजण्याचे काही निश्चित असे साधन उपलब्ध नाही.मात्र या ब्लू प्रिंटमध्ये जनतेच्या गरजेच्या किती गोष्टींना प्राधान्य दिले जाते याबाबत मात्र अनेकदा शंका व्यक्त होत असते. आणि ती बरोबरही असते. अशावेळी महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना सोबत घेत 'मॅक्स महाराष्ट्र्'ने सखोल चिंतन केलं आहे. आणि हे चिंतन तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. या चिंतनातून राज्यकर्ते आणि प्रशासकांना सुद्धा नवी दृष्टी मिळू शकेल.इतके त्यांचे हे विचार वास्तवाला भिडणारे आहेत.अनेकदा कैक प्रश्न हे सामाजिक वास्तव डोळ्यासमोर ठेवून सोडवले गेले पाहिजेत. मात्र पुष्कळदा तसे होतही नाही.हे ध्यानात घेऊन प्रखर सामाजिक मांडणी करणाऱ्या लेखक आणि विचारवंतांना आम्ही एक मोकळं विचारपीठ उपलब्ध करून दिले आहे.



Updated : 4 March 2024 4:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top