घरातून काम करतात त्यांना जनताच घरी बसवते - मुख्यमंत्री शिंदे
X
आज नाशिक येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
नाशकात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम सराकारी काम बारा महिने ही संकल्पना मोडीत काढायची आहे. म्हणून शासन आपल्या दारी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र सरकार लोकांच्या दारी फिरतंय अशी टीका काहीजण करतात. परंतु सत्ता ही लोकांच्या दारोदारी फिरुन काम करण्यासाठी असते. घरात बसण्यासाठी सत्ता नसते. घरी बसतात आणि जे घरातून काम करतात त्यांना जनताच घरी बसवते. असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्वव ठाकरे यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, "आम्हाला लोकांच्या दारात जायला लाज वाटत नाही. बाळासाहेब म्हणायचे लोकांमध्ये जा, त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे जातोय युती सरकारने सर्व निर्णय लोकहीताचे घेतले आहे. लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला पाहीजे. यासाठी आम्ही निर्णय घेत आहोत. अस वक्तव्य ही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.