Home > News Update > राजमुद्रा झाकली, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांचे पुतळेही हटवले, महाराष्ट्र सदनातील प्रकारावरून भुजबळ आक्रमक

राजमुद्रा झाकली, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांचे पुतळेही हटवले, महाराष्ट्र सदनातील प्रकारावरून भुजबळ आक्रमक

राजमुद्रा झाकली, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांचे पुतळेही हटवले, महाराष्ट्र सदनातील प्रकारावरून भुजबळ आक्रमक
X

दिल्लीत भव्य असे महाराष्ट्र सदन उभारण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. त्याबरोबरच राजमुद्रा भिंतीवर छापण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र सदनातील राजमुद्रा झाकली असून अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचेही पुतळे हटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात सावरकर यांच्या फोटोमागे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला. दुसरीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे हटवून त्या ठिकाणी समयी लावण्यात आल्या. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शेण-गोळे सहन करून मोठा त्याग केला. ज्या अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांचेच पुतळे या सरकारला सहन होईना! मला या लोकांच्या बुद्धीची कीव येते! अहो आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही, पण महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय, असं म्हणत छगन भुजबळ यांनी या प्रकाराची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आ

Updated : 29 May 2023 8:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top