बाळासाहेबांची शिवसेना म्हणता पण त्यांचाच फोटो नाही हेच आश्चर्य - छगन भुजबळ
X
सध्या सोशल मिडीयावर शिंदे सरकारने जाहिरातीवर जोरदार चर्चा सुरू आहे. जर हि शिवसेसना पक्षाची जाहिरात असेल तर बाळासाहेबांचा फोटो का नाही? असा प्रश्न अनेक नेते व कार्यकर्ते विचारत आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे आम्हीच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येतो. मात्र मुख्यमंत्री पदाच्या सर्व्हेसंदर्भातील जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये देण्यात आली. या जाहिरातींवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली. 'बाळासाहेबांची शिवसेना' अस म्हणतात पण जाहिरातीत शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो गायब झालं असल्याचं आश्चर्य व्यक्त केल आहे.
दरम्यान छगन भुजबळ म्हणाले की, नेहमी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह आणि खालच्या बाजूला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचे फोटो असायचे परंतु एकदमच उपमुख्यमंत्री फडणवीस गायब झाले याच आश्चर्य आहे. तर 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे ही एकनाथ शिंदे यांची मोठी झेप घेतली. असल्याचा टोला लगावला. फडणवीसांना ते विसरले तर विसरुदेत, पण बाळासाहेबांना तर निदान विसरता कामा नये असा सल्लाही दिला आहे.