गोळीबार प्रकरणातील चेतन कुमार ७ ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी
X
सोमवारी जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसवर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) कॉन्स्टेबलने गोळीबार केला, परिणामी एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन मुस्लीम प्रवासी ठार झाले.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कॉन्स्टेबल चेतन कुमारने धावत्या ट्रेनमध्ये त्याच्या एस्कॉर्ट ड्युटी इनचार्ज (ASI)टिकाराम मीना यांची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या कोचमध्ये जाऊन तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. माणसिक तणावामध्ये त्याने सीनिअर ASI टीकाराम यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती, मात्र चेतन कुमार चा एक व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर या हत्या द्वेषापोटी झाल्याचं समोर आले आहे. हा हत्याकांडासाठी चेतन ला काल अटक करण्यात आली होती. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर चेतन सिंह ला ७ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
या हत्याकांडाचा एक धक्कादायक व्हिडिओ काल समोर आला आहे ज्यामध्ये आरोपी चेतन कुमार एका पीडितेच्या शरीराजवळ उभा राहून इतर प्रवाशांशी बोलतांना दिसत आहे. "पाकिस्तान से संचालित हुए हैं, तुम्हारी मीडिया, यही मीडिया कव्हरेज दिख रहा है, पता चल रहा है उनको, सब पता चल रहा है, इंके आका है वहा… अगर वोट देना है, अगर हिंदुस्तान में रहना है, तो मै कहते हूं, मोदी और योगी, ये दो हैं, और आपके ठाकरे,” असं चेतन सिंह याने या हत्या केल्यानंतर प्रवाशांना सांगितलं.