Home > News Update > ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू: मोदी सरकारची अखेर कबुली

ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू: मोदी सरकारची अखेर कबुली

ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू: मोदी सरकारची अखेर कबुली
X

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदाच ऑक्सिजन मुळे लोकांचा मृत्यू झाल्याची कबूली दिली आहे. कोविड -19 च्या उपचारादरम्यान व्हेंटिलेटरवर असलेल्या काही रुग्णांचा ऑक्सिजनच्या अभावामुळे जीव गेला होता. केंद्र सरकारने आंध्र प्रदेश वगळता कोणत्याही राज्याने ऑक्सिजन पुरवठ्याअभावी कोविड - १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली नसल्याचं म्हटलं होतं.

मात्र, केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री भारती पवार यांनी मंगळवारी (10 ऑगस्ट) राज्यसभेत ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू झाल्याचं कबूल केलं आहे.

तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार कनकामेडला रवींद्र कुमार यांनी आंध्र प्रदेशात अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे झालेल्या मृत्यूंबाबत प्रश्न विचारला होता. दरम्यान या प्रश्नाचं उत्तर देतांना पवार म्हणाल्या की, प्राथमिक तपासानुसार, केवळ आंध्र प्रदेशमध्ये रुग्णालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

पवार यांनी सभागृहाला सांगितले की, आंध्र प्रदेशच्या 9 ऑगस्टच्या पत्रानुसार, 10 मे रोजी राज्यातील श्री वेंकटेश्वर रामनारायण रुईया (एसव्हीआरआर) रुग्णालयात कोविड -19 च्या उपचारादरम्यान व्हेंटिलेटरवर असलेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या मतावर ठाम आहेत की, त्यांनी ऑक्सिजनच्या अभावामुळे किती कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला याची माहिती राज्यांकडून मागितली होती. या संदर्भात द वायर ने वृत्त दिलं आहे.

कोविड -19 च्या लाटांदरम्यान राज्यांना पुरेसा ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आरोग्य मंत्रालयाने सुद्धा याचा उल्लेख केला आहे, दररोजचा वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) पुरवठा, हा फेब्रुवारी 2021 मध्ये दिवशी 1,292 मेट्रिक टन होता. मात्र तो एप्रिल 2021 मध्ये वाढून 8,593 मेट्रिक टन इतका झाला.

पुढे ते म्हणाले,

'ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर निर्बंध लादण्यात आले होते. सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाटपासाठी एक गतिशील आणि पारदर्शक चौकट सुद्धा बनवण्यात आली होती.

मात्र, यापूर्वी, केंद्र सरकारने संसदेत सांगितले होते की, कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून ऑक्सिजनच्या अभावामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Updated : 13 Aug 2021 3:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top