Home > News Update > Mumbai मध्य रेल्वे परिसरातील अनधिकृत दुकानांवर JCB

Mumbai मध्य रेल्वे परिसरातील अनधिकृत दुकानांवर JCB

मुंबई मध्य रेल्वे परिसरात अनधिकृत दुकाने , टपऱ्या झोपडपट्ट्याचं प्रमाण वाढत आहे. रेल्वे प्रशासनाने यांवर कारवाई केली आहे.

Mumbai मध्य रेल्वे परिसरातील अनधिकृत दुकानांवर JCB
X

मुंबई रेल्वे परिसरात फेरीवाले तसेच अनधिकृतपणे दुकाने हॉटेल यामुळे रेल्वे परिसर ‘कबाडखाना’ झाल्याचे चित्र दिसत होते. यावर आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.



मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता हिवाळे आणि DCP राजपूत आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे DCP यांच्या देखरेखेखाली शुक्रवारी मध्य रेल्वेच्या जागेमध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील ट्रॉम्बे आणि माहुल रेल्वे परिसरात असणाऱ्या 8 दुकाने, 3 स्टीलचे कंटेनर आणि 3 कच्च्या झोपड्या अशा एकूण 14 आस्थापनेवर जेसीबी(JCB)मार्फत कारवाई करण्यात आली.



मध्य रेल्वेच्या या कारवाईमुळे अनेक हॉटेल आणि टपऱ्या या जमीन उद्ध्वस्त झालेल्या आहेत. या अतिक्रमणाच्या वेळेस महाराष्ट्र रेल्वे पोलीस (GRP), रेल्वे प्रोटेक्शन फोर्स(RPF), तसेच मुंबई शहर पोलीस(mumbai police) उपस्थित होते.

Updated : 27 May 2023 12:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top