#PetrolDieselPrice : पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त ; एक्साईज ड्युटी कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
X
नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार असल्याचे समजते. त्यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी होत आहे.मागील काही दिवसांपासून सतत नवनवे विक्रम करणाऱ्या पेट्रोल -डिझेल दरात घट होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे, आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात संकटात असलेल्या नागरिकांच्या खिशाला इंधन दरवाढीमुळे मोठी कात्री लागत होती आता केंद्राच्या या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.