...तर औषध कंपन्या सील करणार, नवाब मलिकांचा केंद्राला इशारा
X
राज्यात करोनाचे संकट गंभीर होत असताना आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र सरकारने 16 औषध कंपन्यांशी संपर्क साधून रेमडीसीवीर औषधांची मागणी केल्यानंतर या कंपन्यांनी तसे करण्यास नकार दिला आहे, कारण केंद्र सरकारने या कंपन्यांना महाराष्ट्राला औषधी देऊ नयेत असे आदेश दिल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केली आहे. या कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारला औषधं पुरवली तर कंपन्यांचे परवाने रद्द करु असा इशारा केंद्राने दिल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. या देशात केंद्र सरकारने कशी परस्थिती निर्माण केली आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पण लोकांचा जीव वाचवण्यासाठी रेमडीसीवर औषधी कंपन्यांनी पुरवावे अशी मागणी मलिक यांनी केंद्राकडे केली आहे. तसेच महाराष्ट्राची मागणी पूर्ण झाली नाही तर या कंपन्यांमधील रेमडीसीवर औषधं ताब्यात घेतली जातील आणि गरजूंना त्याचे वाटप केले जाईल, असा इशारा नवाब मलिक यांना दिली आहे.