Home > News Update > 2020 च्या पूरबाधितांसाठी मागितले 3 हजार 700 कोटी केंद्र सरकारकडून मिळाले 700 कोटी

2020 च्या पूरबाधितांसाठी मागितले 3 हजार 700 कोटी केंद्र सरकारकडून मिळाले 700 कोटी

जून - ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे राज्यात मोठे नुकसान झाले होते. अशा पुरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून 700 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पूरबाधितांसाठी 3 हजार 700 कोटींची मदत केंद्राकडे मागण्यात आली होती. मात्र केंद्राने केवळ 700 कोटींची मदत जाहीर केली आहे.

2020 च्या पूरबाधितांसाठी मागितले 3 हजार 700 कोटी केंद्र सरकारकडून मिळाले  700 कोटी
X

मुंबई // कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केल्याच सांगितले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 701 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. जून - ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराचा सर्वाधिक फटका हा राज्यातील शेतकऱ्यांना बसला होता. अनेक ठिकाणी पुराने पीकं आणि शेतातील माती देखील खरडून गेली होती. त्यामुळे शेतीचं मोठ नुकसान झालं होत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे भरघोस मदत करण्याची मागणी केली होती. राज्याकडून केंद्राकडे 3 हजार 700 कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्यातील जून-ऑक्टोबर 2020 मधील पुरबाधित शेतकऱ्यांसाठी केवळ 701 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

पूरग्रस्तांसाठी आज विशेष पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता

दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. ही बैठक पूरग्रस्तांच्या प्रश्नामुळे महत्त्वपुर्ण ठरणार आहे. या बैठकीत विशेष पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सह्याद्री अतिथीगृहात दुपारी साडेबारा वाजता बैठक होईल. यावेळी नुकसानीच सादरीकरण करण्यात येणार असून प्रत्येक विभागाकडून नुकसानीची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील जवळपास 9 जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला आहे . यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग,रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहेत तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली , कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये शेतीसह पिकांची मोठे नुकसान झाले आहे, अनेक ठिकाणी रस्ते, पूल वाहूर गेले आहेत ,वीज यंत्रणा कोलमडली आहे , अनेक गावांमध्ये दरडी कोसळल्या आहेत यासर्व गोष्टींवर सरकारला येत्या काळात काम करावे लागणार असल्याने मोठ्या पॅकेजची आवश्यकता भासणार आहे.

Updated : 28 July 2021 11:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top