लाकडी बैलांना साज घालून तान्हा पोळा साजरा
X
विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात. हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते. बैलाला रंगवणे, तोरण, फुलांनी सजवणे, त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग बालगोपाळांची असते.
या आधुनिक युगात व ऑनलाईनच्या काळात आपली रूढी प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी त्याकरीता असे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. यामुळे पोळा सणाची माहिती लहान चिमुकल्यांना मिळते व मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळतो.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता यंदा बैलपोळा आणि तान्हा पोळा भरविण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी दिले होते.
मात्र कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे, आदेशाचे तंतोतंत पालन करत आज विदर्भात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देशमुख ले आऊट येथे हा तान्हा पोळा साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्यांनी विविध वेशभूषा धारण करून मोठया हर्षाने या तान्ह्या पोळ्यात भाग घेतला.