अनिल देशमुख यांना अखेर सीबीआय का बुलावा...
अनिल देशमुख यांना अखेर सीबीआय का बुलावा... CBI summons former Maharashtra home minister Anil Deshmukh over corruption allegations
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 April 2021 10:00 PM IST
X
X
गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचा हायकोर्टाचा निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. आणि त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देसमुख यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये खंडणीचा आरोप केला होता. याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली होती. या मागणीची याचिका उच्चन्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयानें प्रकरण गंभीर असल्यामुळे अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार आता अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स बजावलं आहे. सीबीआयनं 14 एप्रिलला देशमुख यांना उपस्थित राहण्यास सांगितलं
Updated : 12 April 2021 10:00 PM IST
Tags: CBI Anil Deshmukh news
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire