Home > News Update > आता राज्यातील उद्योगपती सीबीआयच्या रडारवर, एक व्यावसायिक मोठ्या राजकीय कुटुंबाचा नातेवाईक

आता राज्यातील उद्योगपती सीबीआयच्या रडारवर, एक व्यावसायिक मोठ्या राजकीय कुटुंबाचा नातेवाईक

आता  राज्यातील उद्योगपती सीबीआयच्या रडारवर, एक व्यावसायिक मोठ्या राजकीय कुटुंबाचा नातेवाईक
X

सीबीआय (CBI)टीमकडून मुंबई आणि पुण्यातील बड्या उद्योगपतींशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.अविनाश भोसले ,शहिद बलवा आणि विनोद गोयंका या उद्योजकांचा समावेश आहे.सीबीआयकडून सुरु असलेली ही छापेमारी बॅंक घोटाळ्याच्या तपासाच्या संदर्भात असल्याचं सांगितलं जात आहे.

सीबीआय मुख्यालयातील टीमने मुंबई युनिटसह आज सकाळी राज्यातील दोन प्रमुख शहरांतील आठ ठिकाणी छापे टाकले. पुण्यात अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या परिसरात छापेमारी करण्यात आली.तसेच 2G घोटाळ्यात नाव आलेल्या शहिद बलवा यांच्या कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले.सीबीआयच्या टीमने ज्या तीन उद्योगपतींच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत ते तीनही उद्योगपती राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जवळचे मानले जातात.त्यामुळे ही कारवाई राजकीय हेतूने केली असावी, अशा संशय व्यक्त केला जातोय.

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत.तसंच राज्यातील एका मोठ्या राजकीय कुटुंबाचे ते नातेवाईकही आहेत.अविनाश भोसले यांच्यावर ईडीने काही महिन्यांपूर्वी फेमा कायद्याअंतर्गत कारवाई करत जवळपास ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.या कारवाईमध्ये पुणे आणि नागपूरमधील मालमत्तांचा यामध्ये समावेश होता.

Updated : 30 April 2022 4:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top