Home > News Update > हाथरस : उ.प्रदेश सरकारचा खोटारडेपणा उघड, सामूहिक बलात्कार झाल्याचे CBIकडून उघड

हाथरस : उ.प्रदेश सरकारचा खोटारडेपणा उघड, सामूहिक बलात्कार झाल्याचे CBIकडून उघड

हाथरस : उ.प्रदेश सरकारचा खोटारडेपणा उघड, सामूहिक बलात्कार झाल्याचे CBIकडून उघड
X

संपूर्ण देश हादरुन टाकणाऱ्या उत्तरप्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संदिग्धता दूर करत सीबीआयने चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याचा निष्कर्ष काढत आरोप निश्चिती केली आहे. ऐन कोरोना संकटात सप्टेंबर महिन्यात हाथरसमध्ये झालेल्या या घटनेनंतर देशभरातून उद्रेक उमटला होता.

उत्तर प्रदेश पोलिसांनी सुरवातील हे ऑनर किलींग असल्याच सांगितलं होतं. तसंच शवविच्छेदन अहवालही सामुहीक बलात्कार नसल्याचं सांगितलं होतं. मोठ्या प्रमाणात देशव्यापी टीका झाल्यानंतर हा तपास सीबीआयनं हाती घेतला. तीन महिन्यात सखोल चौकशी करुन सीबीआयकडून आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप निश्चित करुन आता सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे.

हाथरसमधे १४ सप्टेंबरला २० वर्षीय दलित तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेचा मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबरला पीडीतेच्या घराजवळ तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत गुपचुप पोलिसांच्या सुरक्षेत पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होतं. रात्रीच्या अंधारात उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले होते.

कुटुंबाची परवानगी नसतानाही अंत्यसंस्कार झाल्याने मोठ्या प्रमाणात उत्तरप्रदेश पोलिसांना टिका झाली होती. यासोबतच पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलीस मात्र कुटुंबाच्या इच्छेनुसारच सर्व काही करण्यात आल्याचा दावा केला होता. ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाच्या देखरेखेखाली सीबीआय तपास करेल असा आदेश दिला होता. दरम्यान सीबीआयने तपास पूर्ण कऱण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. आता २७ जानेवारीला न्यायालयातील पुढील सुनावणी होणार आहे.

Updated : 18 Dec 2020 3:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top