हिमालयीन योगी सापडल्याचा सीबीआयचा दावा
X
गेल्या काही दिवसांपासून हिमालयीन योगी चर्चेत आहे. तर त्याबाबत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापक चित्रा रामकृष्णन यांनी कथीत हिमालयीन योगीच्या सांगण्यावरून निर्णय घेतल्याचे सांगितल्याने देशात मोठी खळबळ उडाली होती. त्या चर्चेतील हिमालयीन योगी सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापक चित्रा रामकृष्णन यांनी कथीत हिमालयीन योगीच्या सांगण्यावरून आनंद सुब्रमण्यम याला नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर आनंद सुब्रमण्यम याचे पॅकेज 15 लाखांवरून 5 कोटी करण्यात आले. तसेच को लोकेशनच्या माध्यमातून चित्रा रामकृष्णन गोपनिय माहिती हिमालयीन योगीला देत होत्या. मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. तर चित्रा रामकृष्णन यांना सीबीआयने अटक केली होती.
त्यावेळी सीबीआयने आनंद सुब्रमण्यम हाच हिमालयीन योगी असल्याचा दावा केला होता. तर त्यापाठोपाठ याबाबत सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात माहिती दिली आहे.
चित्रा रामकृष्णन यांनी एका तेल कंपनीत काम करणाऱ्या आनंद सुब्रमण्यम याला एनएसईच्या गृप ऑपरेटिंगपदी आणि सल्लागारपदी नियुक्ती केली होती. तर आनंद सुब्रमण्यम यांनी 2018 मध्ये केलेल्या को लोकेशन घोटाळा प्रकरणी जामीन अर्ज केला होता. त्यावर सीबीआयने आनंद सुब्रमण्यम हाच हिमालयीन योगी असल्याचा दावा केला. त्यामुळे हिमालयीन योगी सापडल्याचा सीबीआयने केलेल्या दाव्यामुळे आनंद सुब्रमण्यम याच्या अडचणीत वाढ झाली आहे.