मराठा आणि मागासवर्गीय समाजात वाद का निर्माण होतात?
छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र येतात, तर ओबीसी आणि मराठा समाज का एकत्र येत नाही? पाहा विशेष कार्यक्रम...
X
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्यातील सामाजिक वातावरण दुषित होताना दिसत आहे. मराठा समाज विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आता निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती कोणताही मुद्दा चर्चेने सोडवला जाऊ शकतो. ही भावना समोर ठेवू मॅक्समहाराष्ट्र ने मराठा समाजातील प्रतिनिधींशी आणि ओबीसी समाजातील प्रतिनिधींशी थेट संवाद घडून आणला.
या संवादात मराठा आणि मागासवर्गीय यांच्यामध्ये वाद कोण निर्माण करतंय? दोनही समाज एकमेंकांचे शत्रू आहेत असं कोण भासवतंय? या वादाला कोण जबाबदार आहे? छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र येऊ शकतात. तर गावातला मराठा आणि मागासवर्गीय समाज का एकत्र येत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम मॅक्स महाराष्ट्रने ओयोजित केला.
या कार्यक्रमात दोनही समाजाच्या प्रतिनिधींनी अगदी थेटपणे गावातल्या जातीयतेचे विश्लेषन केले. जातीयता नष्ट करण्यासाठी काय करता येईल? याबाबत विचारांची मांडणीही केली. कोणते मुद्दे आले चर्चेत, कुणामुळे जातीयता वाढत आहे? या सर्व प्रश्नांचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम