UPSC कडून Pooja Khedkar वर गुन्हा दाखल, पदवी रद्द करण्याचीही होऊ शकते कारवाई...
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर यूपीएससी कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचं सोबत यूपीएससी कडून पद रद्द का करू नये. या संदर्भात कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
X
यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून आयएएस अधिकारी होणाऱ्या पूजा खेडकर वर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा यूपीएससीने दाखल केला असून स्वतःचं आणि आई-वडिलांच खोटं नाव देऊन परीक्षा दिल्याचा आरोप हा करण्यात आला आहे. याचबरोबर खोटी कागदपत्रे युपीएससीला दाखल केल्याने यासंदर्भात देखील कारवाई पूजा खेडकर वर करण्यात आले आहे. यूपीएससी मध्ये आयएएस अधिकारी म्हणून झालेली निवड, का रद्द करण्यात येऊ नये. यासंदर्भात देखील कारणे दाखवा नोटीस ही यूपीएससी कडून पूजा खेडकर हिला बजावण्यात आली आहे. याचबरोबर भविष्यात यूपीएससीची परीक्षा देण्याकरिता आपल्याला का रोखण्यात येऊ नये या संदर्भात देखील खुलासा पूजा खेडकर तिच्याकडून यूपीएससीने मागितला आहे.
खोटी प्रमाणपत्रे दाखवून, नाव बदलून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत आयएएस अधिकारी होणाऱ्या पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसागणित वाढ होत आहे. आता यूपीएससीने पूजा खेडकर हिच्यावर संबंधित विषयांना अनुसरून कारवाईचा बगडा यूपीएससीनेच उगारला आहे. खोटी कागदपत्रे दाखवून यूपीएससीलाच गंडा घालण्याचा प्रकार पूजा खेडकर यांच्या बाबतीत समोर आला. या नंतर यूपीएससीने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. येत्या काळात पूजा खेडकर यांच्या अडचणीत अधिक वाढ होईल असे चित्र दिसत आहेत.