Panjab Election : केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल, आपकडून आचारसंहिता भंग
रविवारी पंजाबमध्ये 117 जागांसाठी बहुरंगी लढत होणार आहे. मात्र त्यापार्श्वभुमीवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
X
रविवारी पंजाबमध्ये 117 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर आचारसंहिता भंग प्रकरणी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द पंजाबचे राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हा आम आदमी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
पाच राज्यातील निवडणूका आरोप प्रत्यारोपांनी गाजल्या आहेत. त्यातच उत्तराखंड आणि गोव्यात मतदान पार पडले आहे. तर उत्तरप्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील आणि पंजाबमध्ये संपुर्ण मतदान 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर मतदानाला काही तास शिल्लक असताना आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
रविवारी सकाळी पंजाबमध्ये मतदानाला सुरूवात होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर आम आदमी पक्षाने एक व्हिडीओ जारी करत इतर पक्षांविरोधात चुकीचे आरोप करण्यात आल्याचे समोर आल्याने राज्य निवडणूक आयुक्तांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ता असलेल्या अर्शदीप सिंह क्लेर यांनी याबाबत तक्रार दिली होती. तर त्यामध्ये फेसबुक आणि ट्वीटर या सोशल मीडियावर विरोधी पक्षांविरोधात चुकीचा दावा केल्याचे म्हटले आहे.
या व्हिडीओमध्ये इस बार झाडू चलेगा असे म्हटले आहे. तर त्या व्हिडीओत मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, सुखबीर सिंह बादल आणि कॅप्टन अमरींदर सिंग यांच्याविरोधात चुकीचे शब्द वापरले आहेत. त्यामुळे निवडणूकीला काही तास शिल्लक असतानाच आपच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मतदानाच्या काही तास आधी अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याचा आपला फटका बसणार का? अशी चर्चा सुरू आहे.
पंजाबमध्ये रविवारी 117 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या चरणजीत सिंह चन्नी यांना सत्ता राखण्याचे आव्हान असणार आहे. तर 2017 मध्ये 20 जागा जिंकणाऱ्या आपने एकहाती सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याबरोबरच भाजपने कॅप्टन अमरींदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. तर शिरोमणी अकाली दलाने बहूजन पक्षासोबत युती केली आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांचे 22 संघटन असलेल्या संयुक्त किसान मोर्चानेही निवडणूकीत आपले रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे बहुरंगी लढतीत पंजाबींची साथ कोणाला मिळणार हे 10 मार्चला स्पष्ट होणार आहे.