Home > News Update > काय म्हणता, उमेदवाराला पडलं फक्त 'एकच मत`

काय म्हणता, उमेदवाराला पडलं फक्त 'एकच मत`

सोमवारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर आले.तर काही ठिकाणी काही मजेशीर निकाल चर्चेचे विषय बनले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भायगांवगंगा येथील एका उमेदवाराला फक्त एकच मत पडला आहे.

काय म्हणता, उमेदवाराला पडलं फक्त एकच मत`
X

ग्रामपंचायत निवडणुकीत भायगंगा येथील वार्ड क्रमांक 3 मधून कदम पंढरीनाथ साहेबराव निवडणूकीच्या रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात माचे मोतीराम यांनी दंड ठोकले होते. त्यामुळे 193 मतदार असलेल्या या वार्डातुन निवडून येण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी चांगलीच मेहनत घेतली होती.

सोमवारी या ग्रामपंचायतचे निकाल हाती आले, ज्यात वार्ड क्रमांक 3 मधून कदम पंढरीनाथ यांना 191 मते तर माचे मोतीराम याना फक्त एकच मत पडलं. तसेच एक मत नोटाला पडले आहे.माचे यांचं नाव वार्ड क्रमांक 1 मध्ये होते मात्र त्यांनी निवडणूक वार्ड क्रमांक 3 मधून लढवली, त्यामुळे त्यांना स्वतःला-स्वतःच मतदान करता आलं नाही. मात्र त्यांना त्यांच्या एका चाहत्याने मतदान केल हे मात्र खरं.

मागील दोन निवडणुकांपासून सलग विजय मिळत आहे. तर गेल्यावेळी सुद्धा माझ्या विरोधात असलेल्या उमेदवाराला एकच मत पडलं होतं.वार्डातील काम केल्यानेच माझा विजय झाला असल्याचं विजयी उमेदवार कदम पंढरीनाथ यांनी म्हंटलं आहे. तर एव्हीम मशीनमध्ये गरबड असून, या विरोधात न्यायालयात जाणार असल्याच पराभूत उमेदवार माचे मोतीराम यांनी म्हंटलं आहे.

Updated : 18 Jan 2021 9:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top