Home > News Update > कॅन्सरग्रस्तांच्या निवासासाठी आता म्हाडाचा आधार : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

कॅन्सरग्रस्तांच्या निवासासाठी आता म्हाडाचा आधार : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

कॅन्सरग्रस्तांच्या निवासासाठी आता म्हाडाचा आधार : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
X

देशातील सर्वात मोठ्या टाटा कॅन्सर हॉस्पिटल परीसरात नाकात नळ्या घातलेले आणि पुलाखाली मुक्काम असे चित्र आता कदाचित दिसणार नाही. मानवतेच्या नात्यानं म्हाडाचे १०० फ्लॅट्स कॅन्सरग्रस्तांच्या सोयीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवले जाणार आहेत, अशी महत्वपूर्ण माहिती राज्याच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज(गुरूवार) पत्रकापरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईतील टाटा हॉस्पिटलचे अधिकारी देखील उपस्थित होते.

यावेळी आव्हाड म्हणाले, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे व असं अनेकदा दिसून येतं की बरेच रूग्ण किंवा रूग्णांच्या नातेवाईकांना मुंबईतील रस्त्यांवर पडून रहावं लागतं. हे दृश्य पाहून अत्यंत वाईट वाटतं. म्हणून आम्ही मानवतेच्यादृष्टीने असा विचार केला की, आमच्याकडे जेवढे काही फ्लॅट्स आहेत, ते आम्ही आज १०० व आगामी काळात ते वाढवून २०० करणार आहोत आणि ते फ्लॅट्स आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवणार आहोत.

त्यानंतर त्या फ्लॅट्सशी म्हाडाचा काहीच संबंध राहणार नाही. याचं कारण हे आहे की यामध्ये राजकीय हस्तक्षेप येईल. आम्हाला तो नकोय, ज्यांना खरचं गरज आहे, त्यांनाच त्याचा लाभ मिळायला हवा. यासाठी आम्ही हे फ्लॅट्स टाटाला देण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ सात दिवसांमध्ये झाली. याचा मला अभिमान आहे. टाटा व म्हाडामध्ये तसा करार देखील झालेला आहे. करीरोड स्टेशनच्या बाजूला व टाटा कॅन्सर हॉस्पिटलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर हे फ्लॅट्स आहेत."

Updated : 25 March 2021 5:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top