Home > News Update > आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक: OBC आरक्षण, Omiocron आणि एसटी संपावर तोडगा?

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक: OBC आरक्षण, Omiocron आणि एसटी संपावर तोडगा?

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक: OBC आरक्षण, Omiocron आणि एसटी संपावर तोडगा?
X

विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडत असून यामध्ये ओबीसी आरक्षणासह omicron व्हायरस आणि एसटी संपावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परवा राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे सांगत या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने ओबीसी व संवर्गाच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडूनही असेल सत्ताधारी आणि विरोधकांचे अपेक्षा आहे. या निर्णयानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. आरक्षण नाही, तर मतदान नाही, असा निर्धार भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी मतदारांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

ओबीसी आरक्षण हा सारख्या राजकीय मुद्दा बरोबरच ओमिक्रॉनचे संकट या विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तास फोर्स आणि राज्य सरकारमध्ये बैठकांचे सत्र सुरू असून ओमायक्रोन संकटाला रोखण्यासाठी निर्बंध घालावेत किंवा शाळा सुरू करण्यासंदर्भात जे वेळापत्रक निश्चित केले आहेत त्यामध्ये बदल करावा यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंतर होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही एसटी संपावर (ST strike) ठाम असून, आता राज्य सरकार आणखी कठोर होण्याची चिन्हे आहेत. चीमा कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देऊन सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मागील आठवड्यात कामावर हजर नाही राहिलात तर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगितले होते. याचमुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी का?

इतर कोणत्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा याबाबत विचारमंथन होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस तब्येतीच्या कारणास्तव इस्पितळात असलेले मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.


Updated : 8 Dec 2021 11:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top