Home > News Update > मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे फडणवीसांकडून शेतकरी विरोधी प्रवृत्तीला खतपाणी

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे फडणवीसांकडून शेतकरी विरोधी प्रवृत्तीला खतपाणी

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे फडणवीसांकडून शेतकरी विरोधी प्रवृत्तीला खतपाणी
X

आज शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.. यामध्ये तानाजीराव सावंत यांना ही मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय.. यावरूनच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारवर टिका केली आहे..

"तानाजी सावंत यांना ऊसउत्पादक शेतकर्‍यांवर वारंवार अन्याय करण्यात आघाडीवर होते. ऊसाचा दर मागणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करण्याचे काम त्यांच्या बगलबच्चांकडुन झाले आहे. हक्काचे पैसे मागितले म्हणून दमबाजी करणार्‍यांना मंत्रिपद बहाल करून शिंदे फडणवीसांकडुन शेतकरी विरोधी वृत्तीला एकप्रकारे खतपाणी घालण्यात आले आहे" अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रवक्ते रणजीत बागल यांनी केली आहे..

सावंत यांनी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना कायमच चुकीची वागणुक मिळाली. शेतकऱ्यांचे सरकार अशा गर्जना करणार्‍या शिंदे फडणवीसांना शेतकरी विरोधी सावंत कसे चालतात असा सवाल ही बागल यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला..

ऊसउत्पादक शेतकर्‍यांसाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे असाच म्हणावा लागेल. सरकारकडुन सावंतसारख्या प्रवृत्तीला मिळालेले पाठबळ हे सरकारचा शेतकरी विरोधी अजेंडा स्पष्ट करत आहे. मात्र आमचा लढा सुरूच राहील असेही पुढे बोलताना बागल म्हणाले...





Updated : 9 Aug 2022 8:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top