CA Result 2022: सीए अंतिम परिक्षेचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा
X
सीए अंतिम वर्ष व इंटरमिडीएट (CA) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सीए परिक्षेचा अंतिम निकाल (Final results) जाहीर झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. 'दि इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटेंट्स ऑफ इंडिया' (आईसीएआइ) ने सीए अंतिम वर्षाच्या व इंटरमिडीएट परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
सीए परिक्षा 2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यात झाली होती. परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकाल पाहता यावा म्हणून आईसीएआइने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक एॅक्टिव्ह केली आहे. icai.nic.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता. या शिवाय caresults.icai.org व icaiexam.icai.org या दोन संकेतस्थळावरही निकाल पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे.
हर्ष आणि दीक्षाने केले टाॅप :
नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या अंतिम परिक्षेत हर्ष चौधरी या विद्यार्थ्याने टाॅप केले आहे. हर्षने एकूण 618 गुण मिळवत प्रथम क्रमांक (AIR 1) मिळवला आहे. तर एंटरमिडिएट परिक्षेत दीक्षा गोयलने बाजी मारली असून तिने एकूण 693 गुण मिळवले आहेत.
अंतिम परिक्षेचे हे आहेत टाॅपर्स -
रैंक 1 - हर्ष चौधरी (1618 गुण)
रैंक 2 - शिखा जैन (2617 गुण)
रैंक 3 - राम्याश्री (2617 गुण)
रैंक 4 - मानली अग्रवाल (3613 गुण)
इंटर परिक्षेतील टाॅपर्स -
रैंक 1 - दीक्षा गोयल (693 गुण)
रैंक 2 - तूलिका जालान (677 गुण)
रैंक 3 - सक्षम जैन (617 गुण)