Home > News Update > मुंबईत इमारत कोसळली, नऊ लोकांची सूटका करण्यात यश

मुंबईत इमारत कोसळली, नऊ लोकांची सूटका करण्यात यश

गेल्या काही दिवसात राज्यात इमारतींना आगी लागण्याच्या आणि इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मुंबईतील वांद्रे पूर्वमधील बेहराम नगर भागातील इमारत कोसळली. तर घटनेची माहिती मिळताच महापालिकेने घटनास्थळी पोहचून बचावकार्याला सुरुवात केली.

मुंबईत इमारत कोसळली, नऊ लोकांची सूटका करण्यात यश
X

राज्यात इमारत दुर्घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच अनेक शहरांमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर धोकादायक इमारतींवर कारवाई न केल्याने इमारती कोसळून जीवित हानी होत आहे. त्यातच मुंबईतील वांद्रे पुर्व येथील बेहराम नगर भागात पाच मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बेहरामपूर भागात पाच मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्याने महापालिकेचे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तर 6 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

इमारत दुर्घटनेत आतापर्यंत नऊ लोकांना वाचवण्यात यश आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. याबरोबरच घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

या घटनेनंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करत म्हटले की, मुंबईतील वांद्रे पुर्व भागात एक इमारत कोसळल्याने त्यात अडकलेल्या लोकांची माहिती मिळाली. दुर्घटनेच्या गांभिर्याबद्दल आणि लोकांच्या प्रकृबद्दल चिंतीत आहे, असे म्हणत अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रार्थना करतो, असे मत व्यक्त केले.

Updated : 27 Jan 2022 10:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top