Home > News Update > Budget Session : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

Budget Session : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

Budget Session :  संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून
X

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं सावट असताना संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनास ३१ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. तर ०१ फेब्रुवारी ला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीस अधिवेशन हे दोन दोन टप्प्यात होत असते.

त्यातील पहिला टप्पा ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत तर दुसरा टप्पा ११ मार्च ८ एप्रिल ला पार पडणार आहे.

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसद भवनात कोरोनाचा स्फोट झालाय. संसदेतील ७१८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या रूग्णांमध्ये राज्यसभेतील २०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

त्यातच ५० % कर्मचा-यांना work From Home काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ३ दिवसांत कोरोना रूग्णांमध्ये ४३ टक्क्यांनी वाढ झालीय. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या स्वच्छतेच्या कामाची आणि तयारीची पाहणी केली होती.

यावेळी बिर्ला यांनी माध्यमांशी संवाद साधताना संसदेत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरू आहे. मला आशा आहे की, साथीच्या काळात खासदार आणि कर्मचारी सुरक्षित राहतील. ६० वर्षावरील खासदारांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी बिर्ला यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती माध्यमांना दिली होती.

तर दुसरीकडे सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोरोना पार्श्वभूमीवर संसदेतील कामांचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी दोन्ही सभागृहांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Updated : 14 Jan 2022 1:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top