अखेर ठरलं...संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून
नियमित संसदेची हिवाळी आधिवेशन कोरोनाचे कारण सांगून रद्द केल्यामुळं चुहूबाजूनं झालेली टिका लक्षात घेऊन मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) २९ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली आहे. त्यामुळे आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात असणार आहे.
X
चीनभारत सीमेवरील वादंग आणि शेतकरी कायद्यांवरुन सुरु असलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन केंद्र सरकारनं नियमिती संसदेचं हिवाळी आधिवेशन रद्द केलं होतं. त्यानंतर विरोधकांबरोबरच विविध क्षेत्रातून सरकारवर टिका झाली होती.
संसदेच्या आधिवेशनाच्या पहिला भाग २९ जानेवारीपासून सुरू होऊन १५ फेब्रवारी पर्यंत चालेल व दुसरा भाग ८ मार्च ते ८ एप्रिल पर्यंत असेल. तर, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारी रोजी सादर केला जाईल. २९ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. या अधिवेशन काळात करोनाशी निगडीत सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.
करोनाच्या संकट काळात १४ सप्टेंबरपासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन ८ दिवस आधीच संपण्यात आले होते. २४ सप्टेंबरला पावसाळी अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. यावेळी कृषी कायद्यावरुन झालेल्या गोंधळामुळे आठ खासदारांना अधिवेशनासाठी निलंबीत करण्यात आले होते. कृषी कायद्यावरुन काँग्रेसह विरोधी पक्षांची आंदोलन पुकारले होते. विशेष म्हणजे, कमी दिवसात विक्रमी काम या अधिवेशनात पार पडले होते.