नागपूर मध्ये पारडी भागात मेट्रोच्या पुलाचा काही भाग कोसळला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
X
नागपूर : नागपुरातील पारडी भागात मेट्रोच्या (metro bridge collapses) निर्माधिण पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना काल घडली. पुलाचा भलामोठा भाग हा रस्त्यावर आदळला आहे. भागात मेट्रोच्या (metro bridge collapses या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुलाचा मोठा भाग जमिनीवर कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे नेमक काय घडलं कुणालाही कळलं नाही. लोकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पुलाचा भाग कोसळलेला असल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच मेट्रोचे कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अचानक पुलाचा एवढा मोठा भाग कसा काय कोसळला? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. सुदैवाने या मार्गावर गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनास्थळावर मेट्रोचे कर्मचारी पोहोचले असून कोसळलेला पुलाचा भाग बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे.याठिकाणी बघ्याच्या गर्दी झाले मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.