Home > News Update > राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम

राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम

राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत.मुंबई आणि ठाण्यानंतर होत असलेल्या राज ठाकरेंच्या या सभेकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमसाठी दोन दिवस शिल्लक असताना होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची सभा उधळण्याच्या इशारा भीम आर्मीने दिला होता.तसेच आज राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम आहे असे सांगितले जात आहे.

आज औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र ही सभा उधळून लावण्याची भूमिका भीम आर्मीने घेतली आहे. पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या 16 अटींच उल्लंघन राज ठाकरेंनी केलं तर महापुरुष्याच्या नावाने घोषणा देऊन सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होणार असून राज ठाकरेंना भारतीय संविधान भेट देणार असल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिलेली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेमुळे निर्माण झालेला हा वाद आणखी काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.राज्यभरातून औरंगाबादमध्ये आज दाखल होणार आहेत.

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन भीम आर्मी राज ठाकरेंना प्रश्न विचारत आहे.संविधानात कोणत्याही व्यक्तीला कुठेही जाऊन रोजगार मिळवण्याचा अधिकार आहे.तो अधिकार तुम्ही परप्रांतीयांकडून हिसकावून घेतलात तुम्ही संविधानाला मानता की नाही.आज सभेत राज ठाकरे संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवणार का,तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते संविधान मानत नाहीत.हिंदुस्तान असं संविधानात कुठेही उल्लेख नाही.संविधानात भारत असे लिहिले आहे.संविधानित कृत्य महाराष्ट्रात चालू देणार नाही.औरंगाबादला जाऊन हे संविधान मी राज ठाकरेंना देणार आहे. असे वक्तव्य भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केले आहे.

Updated : 1 May 2022 12:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top