केंद्र सरकारची मोठी घोषणा, 10 एप्रिल पासून 18 वर्षावरील नागरिकांसाठी बुस्टर डोस
X
कोरोना विषाणूच्या (Covid 19) रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली असली तरी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (Corona Variant) देशाचे टेन्शन वाढले आहे. त्यापार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने 10 एप्रिलपासून 18 वर्षावरील नागरिकांसाठी बुस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मात्र कोरोनाचा धोका टळला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता पुन्हा एकदा नव्या व्हेरियंटने डोकं वर काढल्यामुळे देशाचं टेन्शन वाढले आहे. त्यापार्श्वभुमीवर केंद्र सरकारने 10 एप्रिलपासून 18 वर्षावरील नागरिकांना कोरोनाचा बुस्टर डोस (Announcement of Booster Dose) देण्याची घोषणा केली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान डॉक्टरांसह फ्रंटलाईन वर्कर्ससाठी कोरोनाचा बुस्टर डोस देण्यात येत होता. (In First Stage booster dose give to Front line Worker) त्यामुळे कोरोनाचा बुस्टर डोस सर्वसामान्य नागरिकांना कधी मिळणार अशी विचारणा केली जात होती. त्यातच आता केंद्र सरकारने 10 एप्रिलपासून कोरोनाचा बुस्टर डोस 18 वर्षावरील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा बुस्टर डोस घेण्यासाठी कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 9 महिन्यांचा अवधी जाऊ द्यावा लागणार आहे. तर बुस्टर डोस सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही उपलब्ध असणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Health Ministry of India)
राज्यात काय आहे परिस्थिती
गुढीपाडव्या मुहुर्त साधत राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता कोणत्याही प्रकारचे कोरोना निर्बंध उरले नाहीत. तर मास्कमुक्त झाल्यामुळे सर्वसामान्या नागरिकांना मोकळा श्वास घेता येत आहे. त्यातच आता कोरोनाचा नवा व्हेरियंट आल्यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता वाढली होती. त्यापार्श्वभुमीवर केंद्र सरकारने केलेल्या घोषणेमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.