हायकोर्टात नवाब मलिकांचा विजय ; समीर वानखेडेंच्या वडिलांची मागणी फेटाळली
X
दररोज आरोप प्रत्यारोप सुरु असलेले वानखडे कुटुंब विरोधातील मलिक कुटुंबाची लढाई हायकोर्टात पोचल्यानंतर आज
मुंबई उच्च न्यायालयाने आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची नवाब मलिकांना रोखण्याची मागणी फेटाळली आहे.
ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास किंवा सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रकाशित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका हायको्र्टात केली होती. मात्र हायकोर्टानं आज नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगत वानखडेंची मागणी फेटाळून लावली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी देखील न्यायालयाने सल्ला दिला आहे. "कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी माहितीची पडताळणी केली पाहिजे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही. नवाब मालक पोस्ट करू शकतात. परंतु कोणतीही गोष्ट पूर्ण पडताळणीनंतरच पोस्ट करावी."
Satyamev Jayate
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 22, 2021
The fight against wrongdoings will continue...
आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर मलिक विरोधी वानखडे सामना रंगला होता. सध्या दुबई दौऱ्यावर असलेले मंत्री नवाब मलिक रोज नवनवे पुरावे सादर करुन समीर वानखडेंना अडचणीत आणत आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले, "सत्यमेव जयते, अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार". नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, जात प्रमाणपत्रातील तफावत असे अनेक आरोप केले आहेत. मात्र, समीर वानखडे आणि कुटुंबियांनी अनेक वेळा हे आरोप फेटाळून लावले आहेत.