Home > News Update > बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; अभिनेता साहिल खानवर आरोप

बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; अभिनेता साहिल खानवर आरोप

बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; अभिनेता साहिल खानवर आरोप
X

मुंबई : 'मिस्टर इंडिया' पुरस्कार प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉडीबिल्डिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बॉडी बिल्डर मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज वर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे ज्यात त्याने अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येला जबाबदार असेल असा उल्लेख केला आहे. मनोज पाटीलने ठाण्यातील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या नावे ही सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यात साहिल खानला योग्य ती शिक्षा मिळावी अशी मागणी त्याने केली आहे.

मागील काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला आणि आपल्या न्युट्रिशन शॉपला विनाकारण टारगेट करत असल्याचे मनोज पाटीलने म्हटले आहे, त्याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्याचं म्हणत, साहिल हा माझ्यात आणि माझ्या पत्नीत असलेल्या वादाचा फायदा घेऊन तिच्या मदतीने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकण्याचे कारस्थान करत असल्याचं मनोज पाटीलने म्हटलं आहे. त्यामुळे आपला अमेरिकेला जायचा व्हिसा रद्द होऊ शकेल असंही त्याने म्हटलं आहे.

दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. मात्र या घटनेने साहिल खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


Updated : 16 Sept 2021 10:46 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top