मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली, १३ मृत्यू
X
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवासी होते...यामध्ये जवळपास 20 ते 25 जण अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती. पण आता या अपघातामध्ये तीन प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळपास 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. एकूण 130 जणांची क्षमता या बोटीची होती. सध्या या बोटीतील उर्वरित सर्व प्रवाश्यांचं बचावकार्य पूर्ण झालं आहे. तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेव्हीची होती, असंही म्हटलं जातंय.
या बोटीमध्ये लहान मुलं, अनेक कुटुंब होती..एक स्पीड बोट या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती. याच बोटीने येऊन प्रवासी बोटीला धडक दिली होती. मुंबईपासून एलिफंटा हे जवळपास 30 किलोमीटरचं अंतर आहे. यासाठी 40 ते 45 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. 3.30 च्या दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडियावरुन सुटली. त्यानंतर 5 ते 8 किमी आतमध्ये ही बोट गेली होती. तेव्हाच एका स्पीड बोटने येऊन या बोटीला धडक दिली.ज्या स्पीड बोटीने या बोटीला धडक दिली ती बोट नेव्हीची असल्याचं म्हटलं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही बोट नेव्हीची असल्याचं म्हटलंय.
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मी देखील तो व्हिडीओ पाहिला. नेव्ही किंवा कोस्टगार्ड अतिशय वेगाने 8 काढत होती. बहुधा त्या बोटीचा कंट्रोल गेला...पण अद्याप नेव्हीकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. जर ही बोट नेव्हीची असेल तर या बोटीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे...सध्या घटनास्थळी नेव्हीचे अधिकारी पोहचले आहेत...
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली, तिघांचा मृत्यूशेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की,जे प्रवासी होते त्यातील दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बरेच प्रवासी वाचलेत. त्यामुळे चिंतेची बाब नाही. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नाही. यासाठी जबाबदार ज्या बोटीने धडक दिली ती बोट आहे. ती बोट नेव्हीची असल्याचं सांगण्यात येतंय, पण ज्यावेळी नेव्हीचे लोक म्हणतायत ती आमची बोट नाही. यासंदर्भातली अधिकृत माहिती समोर यायला हवी.