RBI कडून अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
X
अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी १२ महिन्यांसाठी बरखास्त केले आहे. परिणामी मध्यंतरीच्या काळात बँकेच्या कारभाराचे व्यवस्थापन खराव असल्याने RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची “प्रशासक” म्हणून नियुक्ती केली आहे.
अभ्युदय सहकारी बँकेच्या खराब कामगीरीमुळे आरबीआयने प्रशासकाला त्याच्या कर्तव्याचे पालन करण्यास मदत करण्यासाठी “सल्लागारांची समिती” देखील नियुक्त केली आहे. या “सल्लागार समितीच्या सदस्यांमध्ये माजी महाव्यवस्थापक, SBI व्यंकटेश हेगडे, चार्टर्ड अकाउंटंट महेंद्र छाजेड आणि माजी एमडी, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे सुहास गोखले यांचा समावेश करण्यात आला आहे,” असंही RBI ने एका निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांची कामे सुरू राहणार
अभ्युदय सहकारी बँक लिमिटेड यांच्या भोंगळ कारभारामुळे त्याच्या विरुद्ध कारवाई करणे आवश्यक होते, नागरिकांसाठी RBI द्वारे कोणतेही व्यावसायिक निर्बंध लादले गेलेले नाहीत आणि प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली बँक आपले सामान्य बँकिंग हालचाली सुरू ठेवेल. त्यामुळे ग्राहकांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे