नारायण राणे यांच्या बंगल्यावर BMCचे पथक दाखल
X
केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले असताना आता शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेचे पथक नारायण राणे यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार दाखल महापालिकेकडे दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या के वॉर्डचे पथक नारायण राणे यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. याआधी या पथकाने सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या पथकासोबत पोलिसांचीही कुमक देण्यात आली आहे.
दरम्यान नारायण राणे हे आपल्या बंगल्यावर उपस्थित असल्याचे सांगितले जाते आहे. त्यांच्या अधीश या बगल्याबाहेर पोलीस बंदोसबस्तही वाढवण्यात आला आहे. नारायण राणे यांच्या या बंगल्यात महापालिकेला मोजणी करायची आहे, अशी नोटीस काही दिवसांपूर्वी बजावण्यात आली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी महापालिकेची ही नोटीस केवळ राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. तसेच नारायण राणे यांनी आपल्या घराचे सर्व बांधकाम हे अधिकृत असल्याचेही स्पष्ट केले होते. महापालिकेचे पथक अधीश बंगल्याची पाहणी करणार असून मोजमाप देखील करणार आहे. महापालिकेचे पथक येणार असल्याचे कळताच भाजपचेही काही कार्यकर्ते झेंडे घेऊन नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर हजर झाले आहेत.