#BMCBudget- कोरोना संकट असूनही आरोग्यासाठी वाढीव तरतूद नाहीच
X
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी मुंबई महापलिका निवडणुकीआधीचे शेवटचे बजेट आय़ुक्तींन सादर केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी दिलासा देण्यासाठी 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. कोरोनामुळे यंदा महसुली उत्पन्न कमी झाले आहे. पण मुंबई महापालिकेचे भांडवली खर्च वाढले आहेत. त्यामुळेच महसूली संकलनात सुधारणा करण्याची गरज असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. यंदाचे बजेट हे ३९ हजार कोटींचे आहे. गेल्यावर्षीच्या बजेटपेक्षा यंदाचे बजेच १६.७४ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या दोन वर्षात भांडवली खर्चात १८,७५०.९९ कोटी इतकी लक्षणीय वाढ झाल्याचे आयुत्यांनी सांगितले.
महापालिकेच्या प्रकल्पबाधितांना आता पसंतीचा पर्याय देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व प्रकल्पबाधितांना घर देणे शक्य नाही. अशा लोकांना नुकसानभरपाई देता येईल. यासाठी मुंबई महापालिकेने टोकन प्रोव्हिजन म्हणून शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गोरेगाव- मुलूंड लिंक रोडसाठी १३०० कोटींची तर महत्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोडसाठी यंदा 2 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा आरोग्य विभागासाठी ४७२८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत ही तरतूद कमी आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांच्या सोयीसाठी 'डब्बेवाला भवन' उभारण्यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठीच्या शौचालयासाठी ३२३.२० कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. मिठी नदीच्या विकास खोलीकरण रुंदीकरणासाठी ३१७२ कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
मराठी रंगभूमी कलादालनाच्या विकासासाठी पालिकेने विशेष तरतुद केली आहे. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात ५ गार्डन तयार केले जाणार असून १६० किमीचे १४९ फुटपाथ बांधले जाणार आहेत. तसेच मुंबईच्या प्रत्येक भागात एकूण २०,३०१टॉयलेट बांधणार असून १०८ कम्युनिटी टॉयलेट्स बांधण्याची तरतुद या बजेटमध्ये आहे. मुंबईतील अंधेरी पुल दुर्घटनेनंतर पालिका आता रेल्वेच्या 12 पुलांचे काम हाती घेणार आहे. तसेच कोरोना काळात मुंबईतील हॉस्पिटल्सची कमतरता पाहाता ५ नवीन हॉस्पिटलसाठी निविदा मान्य केल्याचे आयुक्तांनी सांगितले.