महापरिनिर्वाण दिन : यंदा 'ऑनलाईन' अभिवादन
X
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. मात्र, यंदा खबरदारीची योजना म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला अनुयायांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.
दरवर्षी ५ डिसेंबरला देखील अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी रिघ असते. यंदा ती रिघ, अनुयायी दिसले नाही. अनुयायांचे हे सहकार्य उद्या ६ डिसेंबर रोजी देखील अपेक्षित आहे, असे आवाहनही महापौर किशोरी पेडणेकर यांनी याप्रसंगी केले.
दरम्यान, प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी (दिनांक ६ डिसेंबर, २०२०) अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण महानगरपालिकेच्या सोशल मीडियावरुन आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.