Home > News Update > सावधान! काळ्याबाजारातील रेमडेसीवर बनावट...

सावधान! काळ्याबाजारातील रेमडेसीवर बनावट...

सावधान! काळ्याबाजारातील रेमडेसीवर बनावट...
X

बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरू असल्याचं समोर आलंय. मागील आठवड्यात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात रेमडेसिवीर विकताना पकडल होतं. आता यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे रेमडेसिवीरच्या बाटल्यात सलाईनचे पाणी टाकून विकला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. परिणामी या इंजेक्शनचा सर्रास काळा बाजार सुरु असल्याचं समोर आलं आहे. असं असताना तुम्ही घेतलेलं इंजेक्शन हे ओरिजनल आहे का.? हे नक्की तपासून पहा, कारण बीडमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनच्या नावाखाली एका व्यक्तीला बनावट इंजेक्शन देण्यात आलं. याच दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी दोघा जणांना रंगेहात पकडल, या प्रकरणात अधिक तपासाअंती धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे यातील एक आरोपी कंपाउंडर असून त्याने रुग्णालयातील इंजेक्शनच्या बाटल्यात सलाईनचे पाणी टाकून हे इंजेक्शन 22 हजारांना विकण्याचा प्रयत्न केलाय.

काळ्याबाजारात एका इंजेक्शनची किंमत जवळपास 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र, हे इंजेक्शन मिळवण्यासाठी देखील रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिवरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना नोंदणी करण्याचे आवाहन केलं जातंय. परंतु नोंदणी केल्यानंतर जवळपास सहा दिवसानंतर देखील इंजेक्शन हाती मिळत नाही. त्यामुळेच काळाबाजारातून इंजेक्शन विकत घेण्याची वेळ नातेवाईकांवर येते. परंतु या प्रकारानंतर काळ्या बाजारातील इंजेक्शन देखील ओरिजनल मिळण्याची शाश्वती राहिली नाही.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील रेमडेसिवर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचं वास्तव मांडलं आहे. आणि याच अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले, या पत्रात बीडमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शन विशिष्ट पक्षाचे नेते कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत असल्याचा आरोप मुंडेंनी केला आहे.

Updated : 29 April 2021 10:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top