राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा
X
राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार होण्याचा बहुमान भाजपला मिळाला आहे. घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार पराग शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पराग शहा हे घाटकोपरचे विद्यमान आमदार असून निवडणूक विभागाकडे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती ३ हजार ३८३ कोटी रुपये इतकी आहे.
राज्यातील पहिले दोन सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचे आहेत. मंगलप्रभात लोढा यांचा दुसरा क्रमांक असून त्यांच्याकडे सुमारे ४४७ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
कुणाकडे किती संपत्ती आहे यावर एक नजर टाकूयात
१.पराग शहा (भाजप)- ३,३८३.०६ कोटी
२. मंगल प्रभात लोढा (भाजप): ४४७ कोटी
३. प्रताप सरनाईक (शिवसेना): ३३३.३२ कोटी
४. राहुल नार्वेकर (भाजप): १२९.८० कोटी
५. सुभाष भोईर (शिवसेना-UBT): ९५.५१ कोटी
६. जितेंद्र आव्हाड (NCP-शरद पवार): ८३.१४ कोटी
७. नजीब मुल्ला (राष्ट्रवादी): ७६.८७ कोटी
८. आशिष शेलार (भाजप ): ४०.४७ कोटी
९. राजू पाटील (मनसे): २४.७९ कोटी
१०. आदित्य ठाकरे (सेना) २३.४३ कोटी
११. देवेंद्र फडणवीस (भाजप): १३.२७ कोटी
विशेष म्हणजे सर्वात श्रीमंत असलेल्या पहिल्या ११ जणांच्या यादीत एकही कॉंग्रेसचा उमेदवार नाही. यामध्ये एकही महिला उमेदवार देखील नाही....