Home > News Update > राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी
X

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु २०१४ च्या मोदी लाटेत देशाच्या राजकारणाची समीकरणे बदलली, त्याप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा मतदार संघात देखील राजकीय घडामोडी घडल्या. एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वर्चस्व होते. परंतु याला हळूहळू उतरती कळा लागली असून जिल्ह्यातील मोहिते-पाटील यांचे वर्चस्व कमी होते असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोहिते-पाटील यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीला यश आले नाही. माढा मतदार संघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस चे सोलापूर आणि माढा मतदार संघावर वर्चस्व होते. परंतु आता ही सगळी मंडळी भाजपात दाखल झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीवर (NCP)वर्चस्व ठेवण्यात भाजप (BJP) यशस्वी झाली असल्याचे दिसते.

माढा लोकसभा मतदारसंघातील आमदार

माढा लोकसभा मतदार संघात भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अकलूजकरांत नाराजी पसरली आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा आमदार आहेत. माढा - बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट), करमाळा - संजय मामा शिंदे (अपक्ष, अजित पवार गटाला पाठिंबा), सांगोला - शहाजीबापू पाटील (शिवसेना, शिंदे गट), माळशिरस - राम सातपुते (भाजप), माण-खटाव - जयकुमार गोरे (भाजप), फलटण - दिपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)

नेहमीच अटीतटीची लढत

माढा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होतो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. तर सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होते.

रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना अकलूजकरांची साथ मिळणार का?

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठिंब्याने २०१९ साली निंबाळकरांनी माढाचा गड सर केला होता. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने २०२४ ला अकलूज आणि माळशिरस मधून भाजपला लीड मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण माढा मधून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील भाजपकडून इच्छुक होते.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी

सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यात असलेला माढा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, २०१९ च्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपने मुंसडी मारली होती. रणजीतसिंह निंबाळकरांनी अकलूजच्या मोहिते पाटलांच्या साथीनं माढ्याचा गड सर केला होता. मात्र, आता या दोघांमध्ये सगळं काही ठिक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Updated : 14 March 2024 12:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top