चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात भाजपचे आंदोलन
X
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र सध्या सरकारकडून दारूचे दुकाने, हॉटेल्स सुरू करण्यासाठी परवानगी दिली गेली असताना प्रार्थनास्थळ अजूनही बंदच आहे. याचा परिणाम मंदिर परिसरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर होऊ लागला आहे. फुले, हार, विक्रेते, प्रसाद विक्रेते, पुजारी यांच्यासह अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने मंदिरे खुली करावी या मागणीसाठी भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दारूची दुकानं उघडली मात्र मंदिरं उघडण्यास काय अडचण आहे असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
पहिल्या लॉकडाउननंतरही मंदिरं उघडण्यासाठी भाजपकडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आली होती .