अहमदनगर येथील विशाल गणपती मंदिरात महाआरती करून भाजपचे आंदोलन
X
कोरोनाच्या नियमांची पायपल्ली करत राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, अनेक ठिकाणी हॉटेल्स, मॉल सुरु झाली, मात्र मंदिरात जाण्यासाठीच भाविकांना का रोखले जाते?असा सवाल उपस्थिती करत भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे.
अहमदनगर येथील विशाल गणपती मंदिरात भाजपकडून महाआरती करत आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
फक्त मंदिरं खुली केल्यानेच कोरोना वाढतो, का असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांनी उपस्थित केला. नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे आणि औरंगाबाद, शिर्डीसह विविध ठिकाणी स्थानिक भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आणि शंखनाद करत भाजपने मंदिरं उघडण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान अहमदनगरच्या विशाल गणपती मंदिरात महाआरती करत परिसरातून फेरी काढून भाजपने आंदोलन केले.