Home > News Update > अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, आपचा भाजपवर निशाणा

अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, आपचा भाजपवर निशाणा

अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, आपचा भाजपवर निशाणा
X

देशात काश्मीर फाईल्स चित्रपटावरून राजकारण तापले आहे. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मीर फाईल्सवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत, तोच भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे देशात खळबळ उडाली असतानाच आपने या हल्ल्याला भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांत देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर दिल्लीत सत्ता असलेल्या आपने पंजाब पादाक्रांत केले आहे. तर दुसरीकडे देशात सुरू असलेल्या काश्मीर फाईल्सवरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. तर याबाबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्वीटरवरून माहिती दिली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्वीटरवर या घटनेची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर असामाजिक तत्वांच्या लोकांनी हल्ला करत सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरियर तोडले आहेत. तसेच गेटवर लावलेले बुम बॅरियरसुध्दा तोडले आहे.

तसेच पुढे मनिष सिसोदिया यांनी थेट भाजपवर आरोप करत म्हटले आहे की, भाजपच्या गुंड अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करत होते. तर भाजपचे पोलिस त्यांना थांबवण्याऐवजी अरविंद केजरीवाल यांच्या घरापर्यंत पोहचायला मदत करत होती, असा गंभीर आरोप मनिष सिसोदिया यांनी केला.

त्यानंतर मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेत भाजपकडून केजरीवाल यांची हत्या करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप केला आहे.

मनिष सिसोदिया यांच्यापाठोपाठ आता आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून या प्रकरणावर प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली आहे. त्यामध्ये आपने पंजाबमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भाजपला धक्का बसला आहे. त्यामुळे भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केला आहे. तसेच भाजप इतका घाबरला आहे की, त्यांनी केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला होता. तसेच आपने म्हटले आहे की, भाजपला माहिती आहे की, फक्त केजरीवाल हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकतात, असा आरोप आपने केला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्यावर दिल्लीचे नॉर्थ डीसीपींनी सांगितले की, भाजप युवा मोर्चाचे निदर्शने सुरू होते. त्यावेळी जमलेल्या आंदोलकांनी गोंधळ घालत सीसीटीव्हीवर हल्ला केला. त्यानंतर आंदोलकांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर रंग फेकला. मात्र मुख्यंमत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर जमलेला जमाव पांगवण्यात आला. तसेच यावेळी 50 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, अशी माहिती दिली.

Updated : 30 March 2022 7:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top