तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधून भाजप हद्दपार करणार- राहुल गांधी
X
देशातील विरोधी पक्षांच्या बैठकीपुर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधून भाजपला हद्दपार करणार असल्याची घोषणा यावेळी राहुल गांधी यांनी दिली.
देशभरातील 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), के सी वेणूगोपाल (KC Venugopal) आणि जयराम रमेश (Jairam Ramesh) पाटणा येथे पोहचले आहेत. या बैठकीपुर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi Speech) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकमध्ये (Karnataka) भाजपने मोठ मोठे भाषण केले. त्याचा काय परिणाम झाला तो तुम्ही पाहिला. त्यामुळे आगामी काळात तेलंगणा (Telangana), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgrah), राजस्थान (Rajasthan) या राज्यातून भाजप (BJP) हद्दपार झाल्याचं चित्र तुम्हाला पहायला मिळेल. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी झपाटून काम करावं, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.