Home > News Update > केंद्राचं नाही राज्याचं अधिवेशन बोलवा, चंद्रकांत पाटलांचं संजय राऊत यांना उत्तर

केंद्राचं नाही राज्याचं अधिवेशन बोलवा, चंद्रकांत पाटलांचं संजय राऊत यांना उत्तर

केंद्राचं नाही राज्याचं अधिवेशन बोलवा, चंद्रकांत पाटलांचं संजय राऊत यांना उत्तर
X

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांच्या विशेष संसदीय अधिवेशनाची मागणी केली होती. संजय राऊत यांनी ट्विट करुन ही मागणी केली होती.

त्यानंतर संजय राऊत यांच्या मागणीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी कोरोनाच्या साथीबद्दल बोलताना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे ट्वीट आज सकाळी केले होते. ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळीकडे नुसता गोंधळ आणि तणाव आहे.

असं राऊत यांनी म्हटलं होतं.

यावर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना उत्तर देताना

त्यांचे हे म्हणणे अचूक आहे पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला या प्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा.

Updated : 19 April 2021 5:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top