Home > News Update > भाजपचे स्टंट पुन्हा सुरू, उदयनमहाराजांच भीक मांगो आंदोलन

भाजपचे स्टंट पुन्हा सुरू, उदयनमहाराजांच भीक मांगो आंदोलन

भाजपचे स्टंट पुन्हा सुरू, उदयनमहाराजांच भीक मांगो आंदोलन

भाजपचे स्टंट पुन्हा सुरू, उदयनमहाराजांच भीक मांगो आंदोलन
X

लॉकडाऊन हवा की नको, कोविड वर नेमका उपाय काय यावर जागतिक पातळीवर चर्चा सुरू असताना, सुरक्षित अंतर, मास्क यांची शिफारस पंतप्रधानांमार्फत होत असताना भाजप मात्र ज्या राज्यांमध्ये सत्ता नाही तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय आंदोलनं करत आहे.

उदयन भोसले यांनी साताऱ्यात असंच आंदोलन सुरू केलं आहे.

उदयन भोसले यांनी हातात कटोरा घेत आज सातारा पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकास अभिवादन करून भीक मांगो आंदोलन केलं.

 यावेळी उदयन भोसले यांनी सचिन वाझे प्रकरणासह आठवड्याच्या शेवटी लावण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊनवरून सरकारवर टीका केली.


'ज्याचं हातावर पोट आहे त्यांची लॉकडाउनमुळं काय अवस्था झाली असेल. करोनावरील लसीकरण मिळत नाही आणि ज्यांना करोना लस दिलीये ते पॉझिटिव्ह मिळत आहेत. हा काय बाजार मांडलाय का? लॉकडाउन हटवून टाका. मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो. हे सगळं धुळफेक आहे. वाझे प्रकरण लपवण्यासाठी आहे,' सणासुदीचे दिवस आलेत. कामगार लोक आहेत, व्यापारांनी कर्ज काढलं आहे. बँकानी त्यांच्यासमोर पैशासाठी तगादा लावलाय आणि लॉकडाउनमुळं तुम्ही त्यांना भीकेला लावणार का? '' असा सवाल करत उदयनराजे यांनी सरकारवर टीका केली आहे.

यावेळी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली…

गरीब जनता, नोकरदार व शेतकरी वर्गाची आज आर्थिकदृष्ट्या अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. लॉकडाऊनची अशीच परिस्थिती पुढे राहिली तर जनतेच्या हातात नक्कीच कटोरा आल्याशिवाय राहणार नाही. हे राज्यसरकार ने लक्षात घ्यावे. आज सर्व मंत्री आमदार व अधिकारी घरामध्ये निवांत बसले असतील पण अशीच परिस्थिती राहिली तर लोक तुम्हाला घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. वेळीच सरकार ने गांभिर्याने विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा यासाठी मोठा लोकलढा उभारण्याची माझी तयारी आहे व मी यातून मागे हटणार नाही.


आज लोकांना कोरोना लस मिळत नाही तसेच रुग्णांना बेड मिळत नाहीत, रेमडीसीवर औषधाचा काय काळा बाजार चालू आहे हे जनतेला समजायला हवं. जनतेचा उद्रेक होऊन होणाऱ्या नुकसानीस राज्य सरकार जबाबदार असेल.

असा इशारा उदयनराजे यांनी सरकारला दिला आहे.



Updated : 10 April 2021 5:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top