Home > News Update > जिवंत माणूस अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत;भाजप प्रवक्त्याचा दावा खरा की खोटा

जिवंत माणूस अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत;भाजप प्रवक्त्याचा दावा खरा की खोटा

जिवंत माणूस अंत्यसंस्कारासाठी  स्मशानभूमीत;भाजप प्रवक्त्याचा दावा खरा की खोटा
X

सध्या राज्यात दररोज 500 पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्यामुळे अनेक स्मशानभूमी समोर शववाहिकेच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक नातेवाईक आपल्या मृत नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेवर सोपवते.

असाच स्मशानभूमीबाहेरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका शववाहिकेममध्ये जिवंत माणूस स्मशानभूमीवर आणण्यात आला आहे.

यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुरेश नखवा य़ांनी हा व्हिडीओ ट्विटर अकाउंटवरून ट्वीट केला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'हे धक्कादायक आहे, जिवंत माणसाला मुंबई महानगरपालिकेने अंत्य़संस्कारासाठी आणलं आहे. असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

हा व्हिडीओ सुरेश नखवा यांनी ट्वीट करताच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक रिप्लाय आला. त्यामध्ये महानगरपालिकेने सर आम्हाला सदर घटनास्थळाची माहिती द्या. तसंच तुमचाही नंबर द्या. आम्हाला हे लवकरात लवकर योग्य ती माहिती तपासून यावर कारवाई करायची आहे.

असं म्हणत सुरेश नखवा यांच्याकडून महानगरपालिकेने डिटेल्स मागितले.

मात्र, सुरेश नखवा यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर आम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी आम्ही बातचीत केली असता...

हा व्हिडिओ फेक असून मुंबई महानगरपालिका सुरेश यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं. सुरेश हे भाजपचे आयटी सेलचे प्रमुख आहेत. असं त्यांचं म्हणणं होतं. या व्हिडिओचा आणि मुंबई महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही. असा खुलासाही यशवंत जाधव यांनी बोलताना केला.

त्यामुळं भाजपच्या प्रवक्ते सुरेश नखवा यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ खोटा असल्याचं समोर आलं आहे.

Updated : 20 April 2021 10:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top